SARAL महत्वाचे

पंचायत समिती हवेली,जि.प.पुणे (शिक्षण विभाग) च्या अधिकृत ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे             काही तात्रिक अडचणीमुळे सरल साठीच्या माहितीसाठी दिनांक १७ फेब्रुवारी २०१७ पासून Pradeepbhosale.blogspot.in या नविन ब्लॉग ची निर्मिती करण्यात आलेली आहे.तरी आपण यापुढे सरल माहितीसाठी नविन ब्लॉगला भेट द्यावी.यापुढे havelieducation.blogspot.in हा ब्लॉग फक्त हवेली तालुक्यासाठी सेवा उपलब्ध करून देणार आहे.तसदीबद्दल क्षमस्व....             

ABOUT PUNE ZP

 स्व. यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली मे १९६२ मध्ये पुणे जिल्हा परिषदे ची स्थापना झाली.
 स्व. शंकरराव दशरथराव उरसळ यांना पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याचा पहिला मान मिळाला. त्यांनी दि १२/८/१९६२ ते ११/८/१९७२ पर्यत अध्यक्ष पद भुषविले. तेव्हापासून आज अखेर २१ अध्यक्ष झाले. सध्या मा.दत्तात्रय विठोबा भरणे अध्यक्षपद भुषवत आहे.
 आज रोजी १३ पंचायत समित्या व १४०७ ग्राम पंचायती ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत आहेत. शासनाचे कोणतेही नवीन योजना, अभियान, मोहिम, राबविण्यात पुणे जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहीलेली आहे.
 सन 2012 साली पुणे जिल्हा परिषद आय.एस.ओ. 9001-2008 प्रमाणित झालेली आहे.
 यशवंत पंचायत राज अभियान सन २०११-२०१२ जिल्हा स्तरावर महाराष्ट्र राज्यमध्ये पुणे जिल्हा परिषद व्दितीय क्रमांक मानकरी ठरलेली आहे व पंचायत समिती स्तरावरील महाराष्ट्र राज्यमध्ये पंचायत समिती बारामती व्दितीय क्रमांक मानकरी ठरलेली आहे. आणि ग्रामपंचायत कांदली ता.जुन्नर गामपंचायत स्तरावरील महाराष्ट्र राज्यमध्ये तृतीय क्रमांक मानकरी ठरलेली आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.