SARAL महत्वाचे

पंचायत समिती हवेली,जि.प.पुणे (शिक्षण विभाग) च्या अधिकृत ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे             काही तात्रिक अडचणीमुळे सरल साठीच्या माहितीसाठी दिनांक १७ फेब्रुवारी २०१७ पासून Pradeepbhosale.blogspot.in या नविन ब्लॉग ची निर्मिती करण्यात आलेली आहे.तरी आपण यापुढे सरल माहितीसाठी नविन ब्लॉगला भेट द्यावी.यापुढे havelieducation.blogspot.in हा ब्लॉग फक्त हवेली तालुक्यासाठी सेवा उपलब्ध करून देणार आहे.तसदीबद्दल क्षमस्व....             

बडबड गीते

1) आपडी थापडी

आपडी थापडी
गुळाची पापडी
धम्मक लाडू, तेल काढू!

तेलंगीचे एकच पान
दोन हाती धरले कान!


चाउ माउ, चाउ माउ!
पितळीतले पाणी पिउ!
हंडा पाणी गडप!



2)गाडी कशी धावते

गाडी कशी धावते
भप भप भप
पाउस कसा पड़तो
रप रप रप
घोडा कसा धावतो
टप टप टप
बाबा कसे मारतात
धप धप धप
आई कशी महणते
गप गप गप
खाउ देते बाळाला
खुप खुप खुप 


- म पा भावे


3) नाच रे मोरा

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच


ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा ...


झरझर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच, नाच रे मोरा ...


थेंब थेंब तळयात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांत
निळया सवंगडया नाच, नाच रे मोरा ...


पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच, नाच रे मोरा ...

4) आजी बाई

आजी बाई आजी बाई 
कुठे निघाला?
जाणार कुठे मी
जाते देवाला!

आजी बाई आजी बाई
बेल कशाला?
आज आहे सोमवार
महादेवाला!

आजी बाई आजी बाई
दुर्वा कशाला?
आज आहे मंगळवार
गणपतीला!

आजी बाई आजी बाई
हार कशाला?
आज आहे गुरुवार
दत्तगुरूला!

आजी बाई आजी बाई
तांदूळ कशाला?
आज आहे शुक्रवार
अंबाबाईला!

आजी बाई आजी बाई
तेल कशाला?
आज आहे शनिवार
मारूतीला!

5) ये रे ये रे पाउसा 
ये रे ये रे पाउसा 
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाउस आला मोठा
ये ग ये ग सरी
माझे मडके भरी
सर आली धाउमडके गेले वाहून 


1 comment:

  1. sanstha samayojan mahiti kashi Bharayachi Yababat margdarshan karave.

    ReplyDelete

Note: Only a member of this blog may post a comment.